Advertisement

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सनी देओल मुंबईत परतला

पंजाबच्या गुरूदासपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर अभिनेता सनी देओल मुंबईतील घरी परतला आहे. सनीने पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार सुनील जाखड यांना ८२,४५९ मतांनी हरवलं.

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सनी देओल मुंबईत परतला
SHARES

पंजाबच्या गुरूदासपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर अभिनेता सनी देओल मुंबईतील घरी परतला आहे. सनीने पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार सुनील जाखड यांना ८२,४५९ मतांनी हरवलं. सनीचा लहान भाऊ बाॅबी आणि वडील धर्मेंद्र यांनी सनीचा पंजाबमध्ये जोरदार प्रचार केला होता. 

विकासासाठी कटीबद्ध

मत मोजणीला सुरूवात झाल्यापासून सनीने आपल्या प्रतिस्पर्धकाविरोधात आघाडी घेतली होती. लढत जिंकल्यानंतर आपल्या मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी काम करणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. या मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे, हा विश्वास मी नक्कीच सार्थकी लावेल. तसंच दिवंगत खा. विनोद खन्ना यांचं अर्धवट कार्य देखील पूर्ण करेन, असं देखील सनी म्हणाला.  

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह

निवडणूक संपल्यानंतर सनी सोशल मीडियावर देखील अॅक्टीव्ह असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने आपली सेल्फी शेअर केली होती. नुकतीच दिल्लीमध्ये भाजपाप्रणित एनडीएतील ३५२ खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला सनी देओल आणि हेमा मालिनी यांचा समावेश होता.    



हेही वाचा -

आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा