Advertisement

आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?

सध्याच्या सकारात्मक वातावरणात युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही विधानसभा निवडणूक लढवावी, अशी गळ युवासेनेचे पदाधिकारी आदित्य यांना घालत आहेत.

आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?
SHARES

महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवर भाजपा-शिवसेना महायुतीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडवल्याने महायुतीचं मनोबल चांगलंच वाढलं आहे. पाठोपाठ राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही महायुतीचाच झेंडा विधानसभेवर फडकेल, अशी आशा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. अशा सकारात्मक वातावरणात युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही विधानसभा निवडणूक लढवावी, अशी गळ युवासेनेचे पदाधिकारी आदित्य यांना घालत आहेत.    

इंस्टाग्रामवर पोस्ट

युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी यासंदर्भात इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. आदित्य यांना टॅग करून ‘हीच वेळ आहे, हीच संधी आहे. महाराष्ट्र वाट पाहतोय’, असं म्हणत आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी सरदेसाई यांनी आहे.

राजकारणात सक्रीय

आदित्य मागील काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या सभांमध्येही त्यांनी वडील आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहभाग घेतला होता. या दरम्यान त्यांनी केलेल्या आदित्य संवाद कार्यक्रमाला तरूणांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. याआधी आदित्य यांनी महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनची निवडणूक लढवली होती. सध्या ते या संस्थेचं अध्यक्षपद सांभाळत आहेत.  

निर्णय त्यांचाच

आदित्य यंदाची लोकसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा निवडणुकीपूर्वी रंगली होती. परंतु  आदित्य यांनी स्वत:च या चर्चांना पूर्णविराम दिला. उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यावर आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी किंवा नाही याचा निर्णय सर्वस्वी त्यांचाच असेल, असं उत्तर उद्धव यांनी दिलं होतं. 



हेही वाचा-

मोदींविरोधात अपमानास्पद मीम, भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांत तक्रार

पराभूत अशोक चव्हाण देणार प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा