चपलांच्या कंटेनरमधून तीन कोटींच्या परदेशी सिगरेटची तस्करी


चपलांच्या कंटेनरमधून तीन कोटींच्या परदेशी सिगरेटची तस्करी
SHARES

दुबईवरून तस्करी करून आणण्यात आलेल्या १८ लाख परदेशी सिगरेटचा साठा  पकडण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयला(डीआरआय) यश आले आहे. जप्त करण्यात आलेल्या सिगरेटची किंमत सव्वातीन कोटी रुपये आहे. महिलांच्या चपलांच्या नावाखाली या सिगरेटची तस्करी करण्यात आली.

हेही वाचाः- वेब सिरिजद्वारे मनसे मांडणार मुंबईतील खऱ्या समस्या

महिलांच्या चपला असल्याचे जाहिर करण्यात आलेल्या कंटेनरमध्ये प्रत्यक्षात परदेशी सिगरेट भरून दुबईवरून तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार त्यानुसार येथे शोध मोहिम राबवून या सिगरेट जप्त करण्यात आल्या.  गुंडंग गरम या  परदेशी ससिगरेटचा समावेश आले. एकूण १८ लाख  सिगरेट जप्त करण्यात आल्या आहेत. दुबईवरून आलेले हे कन्साईन्मेंट जप्त करण्यात आलेला कंटेनर कोठे जाणार होता. याबाबत डीआरआय अधिक तपास करत आहे. त्यासाठी गरीब व्यक्तींच्या नावाने केवायसी तयार करून या सिगरेटची तस्करी करण्यात आली. पण डीआरआयला याबाबत लवकरच माहिती मिळाल्यामुळे हा कंटेनर जप्त करण्यात आला.

हेही वाचाः- बर्ड फ्लू धोकादायक, राज्यात हायअलर्ट घोषित करण्याची गरज- राजेश टोपे

 लॉकडाऊनच्या काळात सिगरेटची मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे या सिगरेट चढ्या भावाने विकून मोठा फायदा कमवण्याचा या टोळीने कट रचला होता. पण त्यापूर्वीच डीआरआयने दोन कारवायांमध्ये २५ कोटी रुपयांच्या सिगरेट जप्त केल्या होत्या

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा