त्यानं अंगावर पेट्रोल ओतलं, पण थोडक्यात वाचला!

  मुंबई  -  

  भाईंदर - गोल्ड नेस्ट सर्कलवर शुक्रवारी सकाळी एका टुरिस्ट गाडीच्या चालकाने स्वत:वर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राजेश डांबरे असे या ड्रायव्हरचे नाव आहे. राजेशने स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पण घटनास्थळी असलेल्या टॅक्सी चालकांनी त्याला अडवले. त्यामुळे राजेशचे प्राण वाचले. पोलिसांनी राजेशला ताब्यात घेतले. पण या घटनेनंतर राजेशची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  शिवसेनेचा एक स्थानिक नेता राजेशकडे वारंवार पैशांची मागणी करायचा. पैसे देण्यास नकार दिल्यावर तो पोलिसांच्या मदतीने त्रासही द्यायचा. त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला, असा आरोप राजेशसोबतच्या इतर टॅक्सी चालकांनी केला आहे. 


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.