कांदिवलीत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

  Malad West
  कांदिवलीत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
  मुंबई  -  

  कांदिवली - अंमली पदार्थ विरोधी शाखेचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडेंनी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मालाडच्या माइंड स्पेस मागील रोडवर लांडे यांनी छापे टाकून अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत ही कारवाई करून पाच जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून जवळपास ७० लाखांच ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  यामध्ये अटक करण्यात आलेला एक आरोपी हा झी टीव्हीचा असोसिएट प्रोड्युसर असून त्याचं नाव समीर मोदी (२२) असं आहे. तर पकडण्यात आलेल्या इतर आरोपींची नावं अरबाज ताज मोहम्मद खान (२०), फरहान अली खान (२६), चिराग महावीर जैन (२४) आणि लक्ष्मण उर्फ़ निखिल राजन (२४) अशी आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.