मुंबईत साडेपाच कोटींचं ड्रग्स जप्त, दोघांना अटक

मुंबईत अंमली पदार्थांविरोधात एकाच महिन्यातील एनसीबीची ही तिसरी कारवाई आहे.

मुंबईत साडेपाच कोटींचं ड्रग्स जप्त, दोघांना अटक
SHARES

अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईत तब्बल साडेपाच कोटी रूपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहे. एनसीबीने बुधवारी ही कारवाई केली. मुंबईत अंमली पदार्थांविरोधात एकाच महिन्यातील एनसीबीची ही तिसरी कारवाई आहे. 

एनसीबीने मुंबईत बुधवारी केलेल्या कारवाईचे तपशील जाहीर केले आहेत. या कारवाईत १ किलो २५० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. याची बाजारातील किंमत २ कोटी ५० लाख रुपये आहे. याशिवाय ३ कोटी २४ लाख रुपये किंमतीचं १ किलो ८० ग्रॅम हेरॉईन आणि ब्राऊन शुगरही जप्त करण्यात आलं आहे. तसंच ६५ हजार रुपयांची रोकडही जप्त केली.  या सगळ्याची एकूण किंमत ५ कोटी ७४ लाख ६५ हजार एवढी असल्याचं एनसीबीने पत्रकार परिषदेत सांगितलं.

या प्रकरणी संजीब निर्मय सरकार (३९) आणि सलीम अकबर खान (४१) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर अंमली पदार्थ बाळगण्याबाबतच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकानं ३० जूनला गोरेगावमधून आरोपींकडून हा माल हस्तगत करून त्यांना अटक केली होती.



हेही वाचा-

जुलै महिन्यात ९६ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज

बापरे! लसीकरण शिबिरांत सलाइन वॉटरचा वापर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा