परदेशी ड्रग्ज तस्करांना मस्जिदमधून अटक


परदेशी ड्रग्ज तस्करांना मस्जिदमधून अटक
SHARES

मुंबईच्या मस्जिद येथे 32 किलो मिराच्या पानांची विक्री करण्यासाठी आलेल्या तीन परदेशी नागरिकांना महसूल गुप्तवार्ता संचलनालय (डीआरआय)ने अटक केली आहे. ग्रीन टीच्या नावाखाली हा परदेशी नागरिक या ड्रग्जची तस्करी करण्यासाठी मुंबईत आला होता.

भारतात बंदी असलेली मिराची पानं (खत) इथोपियातून पोस्टाद्वारे आणली जात असल्याची माहिती सूत्रांकडून डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार 13 जुलैला मुंबई विमानतळावरून डीआरआयच्या 32.80 किलो मिराची पाने जप्त करण्यात आली.


अटक आरोपींची नावं

त्यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या तस्करांकडून या परदेशी टोळीची माहिती मिळाली. या टोळीचा माघ काढत डीआरआयच्या अधिकाऱ्यांना हे परदेशी नागरिक अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मस्जिद येथील मोहम्मद अली रोडवरील एका हॉटेलमध्ये ग्रीन टी च्या नावाखाली मिराच्या पानांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली असता डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अब्दुल अझीझ युसुफ उस्मान (29), आमीर अब्दुल रझाक (27) या इथोपियन आरोपींसह अहमद सालेह अहमद मारेय (32) या येमेनच्या आरोपीला अटक केली.


व्हिडिओग्राफीच्या आडून ड्रग्ज तस्करी

भारतात टुरिस्ट व्हिजाच्या नावाखाली प्रवेश करून व्हिडिओग्राफीच्या आडून ड्रग्ज तस्करी करतात. यातील अब्दुल अझीझ हा नवी दिल्लीतून तस्करीसाठी मुंबईत आला होता. तर आमीर कुलाब्यात, तर अहमद हैदराबाद येथे वास्तव्याला होता. हे आरोपी प्रतिकिलो (72 अमेरिकन डॉलर) म्हणजेच पाच हजार रुपये दराने ही मिराची पाने खरेदी करतात. भारतात आल्यानंतर ती पाने येमेनी नागरिकांना (250 अमेरिकन डॉलर) 17 हजार 500 रुपयांना विकली जातात.

या टोळीचे जाळे संपूर्ण देशात पसरले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यातील एकाचा व्हिसा संपला असून, त्याच्याकडे युनायटेड नेशन्स उच्चायुक्तांचे रेफ्युजी कार्ड आहे. त्याने जूनमध्ये 40 किलो मिराची पाने भारतात आणल्याचं चौकशीतून निष्पन्न झालं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा