पोटातून निघाले कोकेन, परदेशी महिलेला अटक

जे.जे. रुग्णालयात तिचा एक्‍सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्या पोटात संशयीत कॅप्सूलजन्य वस्त असल्याचे निष्पन्न झाले होते.

पोटातून निघाले कोकेन, परदेशी महिलेला अटक
SHARES

मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या बोलिविया देशातील महिलेच्या पोटातून १३ ड्रग्सने भरलेले निरोध काढण्यात आले आहेत. त्यात ३०० ग्रॅम कोकेन सापडले असून त्याची किमत एक कोटी रुपये आहे.या महिलेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महसुल गुप्तवार्ता संचलनालयाने(डीआरआय) अटक केली होती.

हेही वाचाः- Coronavirus : हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर- नर्सेसच्या चाचण्या निगेटिव्ह

महसुल गुप्तवार्ता संचलनालयाने(डीआरआय) बोलिविया देशातील नागरीक असलेल्या महिलेला कोकेनसह शुक्रवारी अटक केली.रिबेरा अनेज डिलिसिया(५४) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती साओपावलो येथून अदिस अबाबा मार्गे मुंबई विमानतळावर दोन मार्चला आली होती. डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, अदिस अबाबा येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवारी या महिलेला ताब्यात घेण्यात आले. या महिलेच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता या महिलेवर वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्या अंतर्गत जे.जे. रुग्णालयात तिचा एक्‍सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्या पोटात संशयीत कॅप्सूलजन्य वस्त असल्याचे निष्पन्न झाले होते. 

हेही वाचाः- मुंबईत उकाडा वाढला, कमाल तापमानात वाढ

त्यानंतर डॉक्‍टरांनी तिच्या पोटातून या १३निरोध बाहेर काढले. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन ३०० ग्रॅम असून त्याची किंमतएक कोटी रुपये आहे. दोन दिवस तिच्यावर वैद्यकीय उपचार करून हे निरोध काढण्यात आले. चौकशीत हा माल तिला सांताक्रुझ येथील दोन नायजेरीन व्यक्तींना द्यायचा होता. हा माल ब्राझीलमधील एका नायजेरीयन ड्रग्स तस्कराने पाठवला होता. मुंबई किंवा मकाऊ येथेही ड्रग्स नेण्यासाठी आरोपींनी तिला विचारले होते. तिने मुंबईला पसंती दाखवल्यानंतर एक दिवस आधी निरोधात लपवलेले ड्रग्स गिळून ती मुंबईत आली. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा