चेंबूरमध्ये 10 किलो एमडी ड्रग्ज जप्त

 Chembur
चेंबूरमध्ये 10 किलो एमडी ड्रग्ज जप्त

चेंबूर - छेडानगर परिसरातून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे . प्रविण वाघेला (34) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 10 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. बाजारात या ड्रग्जची किंमत 2 कोटींच्या आसपास आहे.

छेडा नगर परिसरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती घाटकोपरच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी होंडा सिव्हीक्स गाडी पकडली. गाडीची झडती घेतली असता गाडीत 10 किलो एमडी ड्रग्ज सापडले. प्रवीण वाघेला हा वांद्रे परिसरात राहतो. ड्रग्ज पोहोचवण्यासाठी तो चेंबूरला आल्याची माहीती पोलिसांनी दिली.

Loading Comments