मित्रानंच केली मित्राची हत्या

 Mazagaon
मित्रानंच केली मित्राची हत्या

माझगाव - माझगाव परिसरात मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्यानं खळबळ उडाली. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी अजय राजभर नावाच्या ३० वर्षाच्या व्यक्तीला हत्येच्या आरोपाखाली अटक केलीय.

रविवारी संध्याकाळी अजय आणि त्याचा मित्र ठाकूर राजभर हे सेल्स ऑफिसच्या समोरील सेठना हॉल कंपाऊंड इथं दारू पित बसले होते. कोणत्या तरी मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झालं. भाडणाचं रुपांतर मारामारीत झालं. रागाच्या भरात अजयनं विजयच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.

Loading Comments