दारूच्या नशेत मित्राची हत्या

 Mumbai
दारूच्या नशेत मित्राची हत्या

मालाड - मद्यधुंद अवस्थेत एका मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात मंगळवारी रात्री 12.30 वाजता घडली.

दिलीप रामदास सूर्यवंशी आणि जफर हुसैन खान हे दोघेही मित्र मालवणीतल्या फायरब्रिगेड जवळ असलेल्या उद्यानात मंगळवारी रात्री मद्यप्राशन करत होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. अचानक वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. याच दरम्यान जफरने दिलीपवर चाकूने वार करून त्याची हत्या केली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी जफर खानविरोधात भा. दं. वि कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading Comments