दोन हजाराच्या नोटेवरून दारूड्यांत भांडण

 Ghatkopar
दोन हजाराच्या नोटेवरून दारूड्यांत भांडण

घाटकोपर - 2000 ची नोट चांगली की वाईट यावरून दोन दारूड्यांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रुपांतर अखेर मारहाणीत झालं. या मारहाणीत दोघांनीही दारूच्या नशेत एकमेकांच्या डोक्यात बिअरची बॉटल फोडली. यात दोघांनाही दुखापत झाली असून, पोलिसांनी त्यांना अटक केलीय. दिपक आणि व्यकंट अशी या दोन दारूड्यांची नावं आहेत. घाटकोपरमधील हिमालय सोसायटीजवळ नंदीनी बिअर शॉप येथे तीन तळीराम गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास बिअर पिण्यासाठी गेले होते. मोदी सरकारनं नवीन चलनात आणलेली 2000 ची नोट चांगली की वाईट यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू झाल्याचं बिअर शॉपचे मालक मोहम्मद शेख यांनी सांगितलं .

Loading Comments