रहिवाशांच्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला

Chembur
रहिवाशांच्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला
रहिवाशांच्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला
See all
मुंबई  -  

घराबाहेर पार्क केलेली दुचाकी दोन चोरट्यांनी पळवल्याची घटना मंगळवारी रात्री चेंबूर नाका परिसरात घडली. सुदैवाने एका रहिवाशाच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने तात्काळ इतर रहिवाशांच्या मदतीने या चोरट्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान चेंबूर पोलिस या आरोपीचा शोध घेत आहेत.

सायन-ट्रॉम्बे रोडवर असलेल्या महाराणा हॉटेल बाहेर दोन संशयित लुटारू मोटारसायकल चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे येथील भाईभाई नगरातील रहिवाशांच्या लक्षात आले. रहिवाशांनी तात्काळ ही माहिती पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली. मुख्य नियंत्रण कक्षातील पोलिसांकडून घटनेची वर्दी मिळताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्याचे दिसताच लुटारूंनी आपली मोटारसायकल तेथेच सोडून पळ काढला. स्थानिक नागरीक आणि पोलिसांच्या सर्तकतेमुळे लुटारूंचा मोटारसायकल चोरीचा प्रयत्न फसला. चेंबूर पोलिसांनी लुटारूंची ही मोटारसायकल ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणली. मोटारसायकलच्या क्रमांकाच्या आधारे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून गाडीच्या मालकाचा शोध घेण्यात येत असून, येथील सीसीटीव्हीच्या आधारे लुटारूंचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.