पवईत डम्पर पलटी

पवई - भरधाव वेगात येणाऱ्या डम्पर चालकाचा ताबा सुटल्याने डिव्हायडरला धडक बसून, डम्पर पलटी झाल्याची घटना पवईत घडली. या डम्परमध्ये बसलेले दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शनिवारी रात्री एक वाजताच्या सुमारास कांजुरमार्गावरून हा डम्पर जात होता. त्यावेळी वळन घेताना अचानक चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला.

Loading Comments