तोतया पोलिसांची घरात घुसून लूटमार


तोतया पोलिसांची घरात घुसून लूटमार
SHARES

पोलीस असल्याचे सांगत एका व्यापाऱ्याच्या घरात घुसून चार तोतयांनी दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी कुर्ला येथे घडली. साहुल हमीद असे पीडित व्यापाऱ्याचे नाव असून ते कुर्ला पश्चिम येथील शालीमार हॉटेल परिसरात राहतात. बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले. आपण पोलीस असल्याचे सांगत या आरोपींनी घराची झडती घ्यायची असल्याचे हमीद यांना सांगितले. त्यानंतर जबरदस्ती घरात घुसून हमीद आणि त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना या तोतयांनी जबर मारहाण केली. त्यानंतर घरातील कपाटामधील काही रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू असा एकूण 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल घऊन पोबारा केला. घटनेनंतर हमीद यांनी तत्काळ विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा