काय सांगता ! पोलिस आरोपींना दत्तक घेणार


काय सांगता ! पोलिस आरोपींना दत्तक घेणार
SHARES

मुंबईतील गुन्हेगारीवर नियंत्रण राहावे, यासाठी पोलिसांनी एखाद्या लहान मुलाप्रमाणे गुन्हेगार, आरोपींवर कायम नजर ठेवण्याचे ठरविले आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी 'आरोपी दत्तक योजना' आणली असून प्रत्येक पोलिसाला एका आरोपी दत्तक म्हणून दिला जाणार आहे. गेल्या दोन महिन्यांत १४ हजार ८५८ गुन्हेगार पोलिसांचे 'दत्तक' झाले आहेत. गुन्हेगारांकडून चांगला वर्तन व्हावे म्हणून बॉण्ड भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि जर या बाॅण्डचे उल्लंघन केले तर १५ ते ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड या गुन्हेगारांना भरावा लागणार आहे.

हेही वाचाः- मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरतेय..!

छोट्या मोठ्या भुरट्या चोरांपासून ते अगदी अंडरवर्ल्ड डाॅन या मुंबईने पाहिलेत. त्यामुळे गुन्हेगारांची राजधानी “मुंबई” अशी एक ओळख मुंबईची आहे. ही ओळख पुसली जावी याकरता मुंबई पोलीस सतत प्रयत्नशिल असतात. याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलिसांनी अशी एक युक्ती शोधून काढली आहे ज्यामुळे गुन्हेगारीला आळा तर बसलेच पण गुन्हेगारांनी ही चाप बसेल. याकरता मुंबई पोलिसांनी सुरू केले आहे “आरोपी दत्तक योजना”.मुंबईत ९४ पोलीस स्टेशन आहेत. या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारांची संख्या काही कमी नाही. कारण मुंबईतील गुन्हेगार सुद्धा सतत काही ना काही नवीन युक्ती वापरुन गुन्हे करत असतात. हे आव्हान मुंबई पोलीस यशस्वीपणे निभावतात यांत काही शंका नाही. पण गुन्हेगारांचा बिमोड करुन मुंबईकरांना सुरक्षित वातावरणात जगता यावे याकरता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा कंबर कसत “आरोपी दत्तक योडना” हाती घेतली आहे.

हेही वाचाः- मुंबईत परजिल्ह्यातून येणारे दूध भेसळमुक्त; दुधाचा दर्जाही  कमी प्रतीचा

नोव्हेंबरपासून 'आरोपी दत्तक योजना' सुरू करण्यात आली आहे. या योजनेत १४ हजार ८५८ आरोपींना आतापर्यंत सहभागी करून घेण्यात आले आहे. आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर मुंबईत नेमणुकीला असताना त्यांनी ही योजना राबवली होती. मात्र त्यावेळी ती विशिष्ट भागापुरती मर्यादित होती. संपूर्ण मुंबईत ही योजना अंमलात आणण्याची ही पहिलीच वेळ आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा