शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ७ तास चौकशी

मला पुन्हा चौकशीला बोलावलेले नाही. ईडीला जेव्हा जेव्हा माझी चौकशी करावी, असे वाटेल तेव्हा मी हजर राहीन, असे सरनाईक यांनी सांगितले.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ७ तास चौकशी
SHARES

टॉप्स ग्रुपच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणात तीन वेळा समन्स बजावून देखील चौकशीला हजर न राहिलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक गुरूवारी सक्तवसूली संचलनालय कार्यालयात  चौकशीला हजर राहिले. तब्बल सात तासाच्या चौकशींतर सरनाईकांना ईडीने जाऊ दिले. MMRDS कंत्राटातील गैरव्यवहारातील काही रक्कम सरनाईक यांना मिळाल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यावेळी सरनाईक यांनी मला जे विचारण्यात आले. त्याची उत्तरे मी दिलेली आहेत. मला पुन्हा चौकशीला बोलावलेले नाही. ईडीला जेव्हा जेव्हा माझी चौकशी करावी, असे वाटेल तेव्हा मी हजर राहीन, असे सरनाईक यांनी सांगितले.

हेही वाचाः- गुड न्यूज! आता सर्व शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत रक्त

सर्वोच्च न्यायलयाकडून दिलासा मिळाल्यानंतर गुरूवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास सरनाईक ईडी कार्यालयात दाखल झाले.  नंदा यांच्याशी असलेले संबंध, एमएमआरडीए कंत्राटातील व्यवहार, अमित चंडोळेच्या चौकशीत निष्पन्न झालेली माहिती आदींबाबत सरनाईक यांची चौकशी करण्यात आली. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास सरनाईक ईडी कार्यालयातून बाहेर पडले. ईडीने मला जे प्रश्न विचारले त्याची उत्तर मी त्यांना दिलेली आहेत. पुढे चौकशीसाठी बोलवलेलं नाही. राहिला प्रश्न गैरव्यवहाराचा तर ईडीने त्याप्रकरणी चौकशी करून आरोपी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, असे सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान चौकशीत आपण ईडीच्या अधिका-यांना पूर्ण सहकार्य केले आहे. ईडी देशातील मोठी तपास यंत्रणा आहे. त्यामुळे जर काही गैरव्यवहार आहे, तर त्याची चौकशी ईडीने नक्की करावी, असेही चौकशीनंतर सरनाईक यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

हेही वाचाः- सर्वांसाठी लोकल पुढच्या वर्षातच? महापालिका आयुक्त म्हणाले...

एमएमआरडीए मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा इडीने न्यायालयासमोर केला आहे. अमित चंडोळे याला अटक केल्या ईडीने त्याच्या कोठडी अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर  गंभीर आरोप केले होते. चंडोले व शशीधरन यांना एकमेकांसमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतीच चंडोळेचा ताबा ईडीने घेतला होता. एमएमआरडीए सुरक्षा रक्षक कंत्राट मधील ३० टक्के बनावट सुरक्षा रक्षकांमधील ५०टक्के हिस्सा अमित चंडोळे घ्यायचा. असे टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांना टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांनी सांगितले होते. मुंबईतील सर्व उड्डाण पुलांवर सुरक्षा रक्षक आणि ट्रॅफिक मार्शल पुरवण्याचे एमएमआरडीए चे कंत्राट टॉप्स ग्रुपला मिळाले होते.अमित चंडोलेला टॉप्स ग्रुप दर महिना ५ लाख रुपये बिझनेस प्रमोशन करता देत असल्याची नोंद आधी करण्यात आली होती. ती नोंदनंतर अमित चंडोळेला दरमाह टॉप्स ग्रुपकडून ६ लाख रुपये पगार म्हणून दाखवण्यात आली होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा