जव्हेरी बाजारात ईडीकडून छापे

 Pali Hill
जव्हेरी बाजारात ईडीकडून छापे

मुंबई - जव्हेरी बाजारातील सोन्या-चांदीच्या चार व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी रात्री छापे घातले. नोटबंदी जाहीर केल्यानंतर या व्यापाऱ्यांनी बोगस कंपन्या स्थापून काळा पैसा पांढरा केल्याचा संशय ईडीला आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर या कंपन्यांच्या खात्यात 69 कोटी रुपये जुन्या नोटांच्या स्वरुपात जामा झाले आहेत. वेगवेगवेगळ्या नावांनी बोगस कंपन्या बनवून हे व्यवहार करण्यात आल्याचंही ईडीच्या लक्षात आलंय. या व्यतिरिक्त या चार व्यापाऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये जमा असेल कोट्यवधी रुपयेही गोठवण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जव्हेरी बाजारात काळे पैसे पांढरे करणारं मोठं रॅकेट सक्रीय असल्याचंही स्पष्ट झालंय.

Loading Comments