मानखुर्द वसतीगृहात आणखी एका मुलाचा मृत्यू

 Mandala
मानखुर्द वसतीगृहात आणखी एका मुलाचा मृत्यू

मानखुर्द - शासनाच्या दुर्लक्षामुळे मानखुर्द वसतीगृहात आणखी एका मुलाचा मृत्यू झाला आहे. बेटा शंकर असं या मुलाचं नाव असून, गेल्या १० दिवसांपासून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन महिन्यात आठ मुलांचा मृत्यू झाल्यानं पुन्हा एकदा येथील मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या दिड महिन्यात सात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी या वसतीगृहाला भेट देत येथील समस्या जाणून घेतल्या. मात्र अद्यापही यावर काहीही उपाययोजना झाल्या नसल्याचं समोर आलं आहे.

Loading Comments