माहिमच्या स्टेटस् रेस्टॉरंटची 4 कोटी 55 लाखांची विजचोरी उघडकीस; दोघांविरोधात गुन्हा दाखल


माहिमच्या स्टेटस् रेस्टॉरंटची 4 कोटी 55 लाखांची विजचोरी उघडकीस; दोघांविरोधात गुन्हा दाखल
SHARES

बीईएसटीच्या दक्षता पथकाने गुरुवारी माहिम परिसरातल्या कटारिया मार्गावरील स्टेटस् गॉरमेट रेस्टॉरंट आणि बँक्वेट हॉलवर धाड घातली आहे. या धाडीमध्ये स्टेटस् रेस्टॉरंटने गेल्या दहा वर्षांत सुमारे 4.55 कोटी रुपयांची विजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी माहिम पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा (2003) चे कलम 135 अंतर्गत शेखर नारायण शेट्टी आणि रणछोड पटेल या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बीईएसटीच्या दक्षता विभागाचे मुख्य उप अधिकारी आर जे सिंह यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्टेटस् रेस्टॉरंट येथे बीईएसटीच्या थेट मीटर बॉक्समधून परस्पर वीज जोडणी करून विजेची चोरी होत असल्याची माहिती बीईएसटीच्या दक्षता विभागाला मिळाली होती. त्यानुसार आर जे सिंह यांच्या आदेशावरुन दक्षता पथकाचे अधिकारी सर्जेराव पाटील यांनी माहिम पोलिसांच्या मदतीने तिथे धाड टाकली. या धाडीत रेस्टॉरंटकडून भारतीय विद्युत कायद्याचे उल्लंघन करून परस्पर विजेची चोरी होत असल्याचे आढळून आले. याबाबत अधिक चौकशी करता ही चोरी गेल्या दहा वर्षांपासून अव्याहत सुरु होती, असेही निदर्शनास आले. या संपूर्ण प्रकरणात बीईएसटीची 19 लाख 97 हजार 040 युनिटस् म्हणजेच चार कोटी 55 लाख 41 हजार 569 रुपये किमतीची वीजचोरी केली असल्याचे उघडकीस आले. यानंतर दक्षता पथकाने संबंधित कारवाईचे छायाचित्रिकरण केले आणि छायाचित्रेही काढली. या प्रकरणाचा पुढील तपास माहिम पोलीस करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा