उपचार न मिळाल्यामुळे 'पारु' चा मृत्यू

 Goregaon
उपचार न मिळाल्यामुळे 'पारु' चा मृत्यू

गोरेगाव - गोरेगाव पूर्व येथील फिल्मसिटीत एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान पारु या 33 वर्षीय हत्तीणीचा मृत्यू झाला. या हत्तीणीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं मानले जात असले तरी गेल्या तीन वर्षांपासून ती गंभीर रोगांनी आजारी असल्याची बाब समोर आलीय. हत्तीणीला त्वचारोगाचे आजार होते. त्यावर मालकानं नीट उपचार न केल्याने हत्तीणीचा मृत्यू झाल्याचे प्राणीप्रेमी संघटनांचे म्हणणे असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दहिसर येथे राहणारे सबा शंकर पांडे यांच्याकडे लक्ष्मी आणि पारु अशा दोन हत्तीणींना बाळगण्याची प्रमाणपत्रे असून ही प्रमाणपत्रे त्यांना बिहारच्या वन विभागाने मंजूर केली होती. मात्र पांडे या दोन्ही हत्तीणींची काळजी नीट घेत नसल्याची तक्रार २०१३ मध्ये मुंबईतील ‘पॉज’ या प्राणीमित्र संघटनेने ठाणे वनविभागाकडे केली होती. तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सबा पांडे दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मुख्य वनविभाग अधिकारी आणि कांदळवने संरक्षण विभागाचे प्रमुख एन. वासुदेवन यांनी सांगितले.

Loading Comments