मुलुंड (mulund) मध्ये लिफ्ट (lift) दुरूस्त करत असताना अचानक लिफ्ट सुरू झाल्यामुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू (death) झाला. संजय यादव असं या मृत लिफ्ट टेक्निशियनचं (Elevator Technician) नाव आहे. लिफ्टमध्ये अडकलेल्या दोन जणांची अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी सुखरूप सुटका केली.
मुलुंड (mulund) पूर्वेकडील रिचा टॉवरमध्ये (Richa Tower) लिफ्ट (lift) दुरस्तीचे काम सुरू होते. गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास लिफ्टच्या दुरुस्तीसाठी इमारतीचे दोन रहिवासी आणि लिफ्टचा टेक्निशियन (Elevator Technician) तेराव्या मजल्यावर लिफ्टची दुरुस्ती करत होते. टेक्निशियन लिफ्टच्या वरच्या भागात काम करत होता. त्यावेळी अचानक लिफ्ट सुरू झाली. त्यामुळे वर असलेला टेक्निशियन लिफ्ट आणि भिंतीच्या पॅसेजमध्ये अडकला. त्यामुळे लिफ्ट आणि भिंतीत चिरडून त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने (Fire brigade) तातडीने तेथे धाव घेतली. तासाभराच्या प्रयत्नानंतर दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. संजय यादव यांचा मृतदेह देखील लिफ्टमधून बाहेर काढण्यात आला. लिफ्टच्या दुरावस्थेबाबत स्थानिक नागरिकांनी विकासकाकडे तक्रार केली होती. मात्र, विकासकाने दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचं स्थानिकांचा आरोप आहे.
हेही वाचा -