एल्विश यादवला अटक, सापाचे विष पुरवल्याची दिली कबुली

26 वर्षीय एल्विशने याआधी आपण या प्रकरणात सहभागी नसल्याचे सांगितले होते.

एल्विश यादवला अटक, सापाचे विष पुरवल्याची दिली कबुली
SHARES

'बिग बॉस OTT 2' चा विजेता आणि लोकप्रिय YouTuber एल्विश यादवला अटक करण्यात आली आहे. रेव्ह पार्टीत सापाचे विष पुरवल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नोएडा पोलिसांनी कारवाई करत एल्विश यादवला अटक केली. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता या प्रकरणात एक मोठा अपडेट समोर आला आहे.

एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की एल्विशने सापांना विष पुरवल्याची कबुली दिली आहे. एल्विशने रेव्ह पार्ट्यांमध्ये साप आणि सापाच्या विषाची व्यवस्था केल्याचे कबूल केले आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी त्याला रविवारी (17 मार्च) अटक करण्यात आली. गेल्या वर्षी सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींना तो ओळखत असल्याचे त्याने चौकशीत कबूल केले.

26 वर्षीय एल्विशने याआधी आपण या प्रकरणात सहभागी नसल्याचे सांगितले होते. मात्र आता पोलिसांच्या चौकशीत त्याने वेगवेगळ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये आरोपींना भेटल्याचे आणि त्यांच्या संपर्कात असल्याचे कबूल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

नेमके प्रकरण काय आहे?

नोव्हेंबरमध्ये नोएडा पोलिस आणि वन विभागाच्या पथकाने 5 साप पकडणाऱ्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून 5 कोब्रा आणि काही विष जप्त करण्यात आले आहे. या आरोपींनी सांगितले की, ते एल्विश यादवला सापाचे विष पुरवायचे. त्यानंतर एल्विश यादव आणि सहा जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एल्विशला अटक करण्यात आली आहे.



हेही वाचा

Ludo वरुन झालेल्या वादतून मित्राला संपवलं

ऐकावं तितकं नवलच! चक्क बस स्टॉपच गेला चोरीला

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा