Ludo वरुन झालेल्या वादतून मित्राला संपवलं

त्यानंतर आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Ludo वरुन झालेल्या वादतून मित्राला संपवलं
SHARES

मुंबईमधील साकीनाक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने आपल्याच मित्राची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लुडो खेळावरून हे झाल्याची माहिती तरी सध्या समोर आली आहे. 

बुधवारी पहाटेच्या सुमारास हा सारा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कुर्ल्यातील घास कम्पाऊंडमधील नवयुवक हाऊसिंग सोसासायटीमध्ये हा प्रकार घडला.

सोसायटीमधील गाळा क्रमांक जी-9 मध्ये 55 वर्षीय गुलाल हमीद यांचा चिंधीपासून कपडे बनवण्याचा व्यवसाय आहे. या छोट्याश्या कारखान्याचा कारभार गुलाल हमीद हे त्याच्या मुलाच्या मदतीने पाहतात.

कारखान्यामध्ये मदतनीस म्हणून गुलाल हमीद यांनी सद्दाम हुसेन रफी आलम या 27 वर्षीय तरुणाबरोबरच मोहम्मद अय्याज नवाब मलिक अहमद शेख (22) या दोघांना कामावर ठेवलं होतं. 

नेहमीप्रमाणे काम संपल्यानंतर गुलाल हमीद आणि त्यांचा मुलगा घरी गेले. तर कामगार सद्दाम आलम आणि मोहम्मद अयाज शेख गाळ्यामध्येच झोपायचे. मंगळवारी रात्रीही असेच घडले. मात्र बुधवारी सकाळी 10 वाजता या जी-9 गाळ्यामध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन दिली. त्यानंतर तातडीने वरिष्ठ पोलीस निरिक्षक गब्बाजी चिमटे हे त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर घटनास्थळी पोहोचले.

मात्र गाळ्याचा दरवाजा बंद असल्याने पोलिसांनी तो तोडला आणि आत प्रवेश केला. समोर पाहिलं तेव्हा एका व्यक्तीने गळफास घेतला असून दुसरी व्यक्ती जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पोलिसांना आढळून आलं. दोघांचेही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठले आहेत. हेही वाचा

कल्याण स्टेशनवर सापडले 54 डिटोनेटर

ऐकावं तितकं नवलच! चक्क बस स्टॉपच गेला चोरीला

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा