एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे पुन्हा सेवेत

वाझे यांनी 63 गुंडांना यमसदनी धाडले होते.गडचिरोलीतून सेवेची सुरूवात करणा-या वाझे ठाणे पोलिस दलात आपल्या कामामुळे प्रसिद्धीला आले. 2002 घाटकोपर स्फोटीतील संशयीत आरोपी ख्वाजा युनुस कोठडीतील संशयीत म

एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे पुन्हा सेवेत
SHARES
मुंबईत 90 च्या दशकात गँगवारने डोके वर काढले असताना, पोलिसांना हे गँगस्टर मोठी डोकेदुखी ठरत होतेे. कालांतराने अशा गुंडाचे एन्काऊंटर करण्यात आला, माञ त्यातील काही एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केले गेले. त्यात काही कर्तबगार अधिकाऱ्यांना निलंबित ही केलं, अशातचं घाटकोपर स्फोटातील आरोपी ख्वाजा युनूसच्या मृत्यूप्रकरणी निलंबीत असलेल्या एन्काऊटर स्पेशलिस्ट सचिन वाजे यांना पून्हा सेवेत सामील करून घेतले आहे. वाझे यांच्यासह 18 पोलिस अधिकारी व कर्मचाऱयांना पुन्हा सेवेत सामील करण्यात आले. मुंबई पोलिस दलातील आणखी 95 पोलिस अधिकारी व कर्मचारी विविध कारणांमुळे निलंबीत आहेत, त्याचे निलंबन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पुनर्विलोकन बैठकीत 113 निलंबीत पोलिसांच्या निलंबनावर चर्चा झाली. त्यातील 95 पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आलेले नाही. ज्यापोलिसांवर विरोधात गंभीर आरोप आहे, तसेच त्यांच्याविरोधात चौकशी अद्याप सुरू आहेत, अशा पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आले नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यातील तीन पोलिसांचे निलंबन पोलिस संचालक कार्यालयामार्फत करण्यात आले होते.


तसेच ज्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यां विरोधात गंभीर आरोप नाहीत, अथवा प्रशासकीय कारणांमुळे ज्यांचे निलंबन झाले आहे, अथवा प्रशासकीय विलंबामुळे ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली, तसेच ज्यांच्यावरील चौकशी संपून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, अशा अधिकारी व कर्मचाऱयांच्या निलंबनाबाबत शुक्रवारी पुनर्विलोकन बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्यात या सर्व अधिका्री व कर्मचाऱयांच्या निलंबनाच्या प्रकरणाची पुन्हा पडताळणी करण्यात आली व ज्यांना शक्य आहे. अशांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. दरम्यान, निलंबन मागे घेण्यात आलेल्या सर्व अधिकार व कर्मचाऱयांना कमी महत्त्वाच्या विभागात बदली करण्यात आली आहे. चकमक फेम वाझे यांनाही सशस्त्र पोलिस दल येथे नियुक्ती करण्यात आली आहे. 

1990 मध्ये सेवेत दाखल झालेल्या वाझे यांनी 63 गुंडांना यमसदनी धाडले होते.गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त परिसरातून सेवेची सुरूवात करणा-या वाझे  ठाणे पोलिस दलात आपल्या कामामुळे प्रसिद्धीला आले. 2002 घाटकोपर स्फोटीतील संशयीत आरोपी ख्वाजा युनुस कोठडीतील संशयीत मृत्यूप्रकरणात त्यांना निलंबीत करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षातही प्रवेश केला होता. ख्वाजा युनुस प्रकरणी वाझे यांच्यासह 14 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.पुढे न्यायालयीन प्रक्रियाही चालली. वाझे यांच्यासर इतर विविध प्रकरणांमध्ये निलंबीत 18 पोलिसांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे. बहुतांश पोलिसांना सशस्त्र पोलिस दलात नियुक्ती देण्यात आली आहे.

मुंबई पोलिस दलात आधीच संख्याबळ कमी आहे. त्यात निलंबीत पोलिस घर बसल्या 75 टक्के पगार घेतात. त्यामुळे त्यांना सेवेत घेऊन कमी महत्त्वाच्या खात्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे संख्याबळाचा प्रश्नही सुटेल व त्यांच्याविरोधात सुरू असणाऱया चौकशीवरही परिणाम होणार नाही, असा पर्याय निवडण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा