स्वामी नारायण चौक अतिक्रमणाच्या विळख्यात


स्वामी नारायण चौक अतिक्रमणाच्या विळख्यात
SHARES

मालाड – येथील पश्चिमेकडील अमरशी रोडवरील स्वामी नारायण चौक अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. भगवान श्री स्वामी नारायण यांच्या स्मृतीनिमित्त स्वामी नारायण मंदिराच्या वतीनं हा चौक बांधण्यात आला. वर्षभरापूर्वी मालाडचे आमदार असलम शेख यांनी या चौकाचं सुशोभीकरणही केलं. मात्र देखभाल नसल्यामुळे त्याची दुरवस्था झालीये.
या चौकाच्या कठड्याभोवती हातगाड्या, सायकल कशाही उभ्या केल्या जातात. तर रस्त्यावरच राहणारे या चौकाच्या रेलिंगचा वापर कपडे वाळत घालण्यासाठी करतायत. काही जणांसाठी तर हा चौक म्हणजे पाहुणचारासाठी हक्काची जागाच झालीये...
याबाबत पी उत्तर पालिका विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी असलम खान यांना विचारल असता, पाहाणी करून अतिक्रमणं हटवण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा