झाकिर नाईकची मालमत्ता जप्त

  Mumbai
  झाकिर नाईकची मालमत्ता जप्त
  मुंबई  -  

  मुंबई - अंमलबजावणी संचलनालयाने वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरु झाकिर नाईकच्या 18.37 कोटींच्या ठेवी जप्त केल्या आहेत. झाकीरवर बेहिशोबी मालमत्ता आणि आयएसया दहशतवादीबरोबर मिळून धर्मांतर करुन, ब्रेन वॉश करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. झाकिरचा बॅंक बँलेंस, प्रॉपर्टी तसंच म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवलेली 18.37 कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचलनालयाने जप्त केली आहे.

  दरम्यान, सोमवारी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने देखील झाकिर विरुद्ध पुन्हा नोटिस (summons) काढली असून 30 मार्च पर्यंत एनआइएच्या दिल्ली हेडकोर्टरमध्ये हजर रहण्यास त्याला सांगितले आहे. सध्या झाकिर सौदी अरेबियाला लपून बसला आहे. या नोटिसकडे दुर्लक्ष केल्यास झाकिर विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस काढली जाऊ शकते, अशी माहिती एनआइएच्या सूत्रांनी दिली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.