परस्पर घर भाड्याने देणाऱ्यास बेड्या

 Powai
परस्पर घर भाड्याने देणाऱ्यास बेड्या

पवई - इमारतीतील रिकामे घर हेरून ते मालकाच्या परस्पर भाड्याने देणाऱ्या ४२ वर्षीय महाठगाला पवई पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. दिनेश मेस्त्री असे या आरोपीचे नाव असून त्याने आतापर्यंत घर भाड्याने देतो असे सांगून मुंबईकरांना ६ ते ७ कोटी रुपयांचा गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पवईमधील एका इमारतीत फ्लॅट भाड्याने देण्याच्या बहाण्याने मेस्त्री याने तक्रारदार ईंदू बनपट्टी (५०) यांच्याकडून २ लाख ७७ हजार ५०० रुपये उकळले होते. मेस्त्री याच्या सांगण्यानुसार इंदू या फ्लॅटमध्ये राहण्यास गेल्या असता मालकाच्या परस्पर फ्लॅट भाड्याने दिल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच इंदू यांनी पवई पोलीस ठाणे गाठून याची तक्रार दिली. त्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पवई पोलिसांनी मेस्त्री याला बेड्या ठोकल्या.

Loading Comments