मुंबईकरांनो, सावधान! शहरात फिरताहेत पोलिसांच्या वेशात भामटे

मुंबईत पोलिसांच्या वेशात भामटे फिरत असून ते सर्वसामान्यांना गंडवत असल्याचं पुढं आलं आहे. मुंबईच्या गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी अशा एका भामट्याला अटक केली असून त्याने पोलिस असल्याचं सांगून आतापर्यंत अनेकांना लाखो रुपयांना गंडवल्याची कबुली दिली आहे.

मुंबईकरांनो, सावधान! शहरात फिरताहेत पोलिसांच्या वेशात भामटे
SHARES

मुंबईकरांनो, जर सावध रहा... एखाद्या सिग्नलवर तुम्हाला पोलिसांनी अडवून कारवाईचा धाक दाखवला, तर आधी खात्री करा की तो खरंच पोलिस कर्मचारी आहे का? कारण सध्या मुंबईत पोलिसांच्या वेशात भामटे फिरत असून ते सर्वसामान्यांना गंडवत असल्याचं पुढं आलं आहे. मुंबईच्या गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी अशा एका भामट्याला अटक केली असून त्याने पोलिस असल्याचं सांगून आतापर्यंत अनेकांना लाखो रुपयांना गंडवल्याची कबुली दिली आहे.

सागर वाल्मिकी असं या आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात मेघवाडी, एमआयडीसी आणि ओशिवरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. एखाद्याला ठकवण्याची ही प्रेरणा आपण पोलिसांकडूनच घेतल्याचं तो सांगतो.


कशी सुचली कल्पना?

खासगी बसवर चालक म्हणून कामाला असलेला सागर वाल्मिकी दिंडोशी परिसरात पत्नी आणि मुलांसोबत राहतो. वाल्मिकीचे पूर्वी मेघवाडी परिसरात एक हाॅटेल होते. त्यावेळी रात्री उशिरपर्यंत हाॅटेल सुरू ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांना चिरीमीरी द्यायचा. एकेदिवशी पोलिसांचा गणवेश घालून आलेल्या व्यक्तीने त्याला गंडवून त्याच्याकडून पैसे लुबाडले. चौकशीनंतर आपली फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं.


शक्कल कामी आली

कालांतराने व्यवसाय होत नसल्यामुळे सागरने ते हाॅटेल बंद करून चालक म्हणून नोकरी सुरू केली. सोबतच झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्याने आपण पोलिस अधिकारी असल्याचे सांगून सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली एकाला गंडवले. ही युक्ती कामी आल्यामुळे पुढे सागर अशाप्रकारे अनेकांना गंडवू लागला.


कुणाकुणाला फसवलं?

नुकतीच सागरने ओशिवरा पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या महिलेला आपण गुन्हे शाखा १० मध्ये पोलिस अधिकारी असून वडिल पोलिस दलात वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याचं सांगितलं होतं. तसंच मंत्रालयात कामाला लावण्याचं आश्वासन देत त्याने त्या महिलेकडून ६० हजार रुपये घेतले. याचप्रकारे सागरने एमआयडीसी परिसरातील एका नागरिकाला बीएमसीतून गुमास्ता परवाना काढून देण्यासाठी ५० हजार रुपये घेऊन फसवलं. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.


चेहरा उघड झाला

काम वेळेत होत नसल्याने पीडित महिला सागरची चौकशी करत गुन्हे शाखा १० च्या कार्यालयात पोहोचली. त्यावेळी अशी कोणतीही व्यक्ती गुन्हे शाखेत कार्यरत नसल्याचं या महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने सागर विरोधात आेशिवरा पोलिसांत गुन्हा नोंदवला. सागरचा फोटो तिने पोलिसांना दिला होता. सागर कायम पोलिसी वेशात फिरत असून गाडीवर पोलिसांची पाटी लावतो, अशी महितीही तिनं पोलिसांना दिली होती.


'असा' सापडला तावडीत

दरम्यान १३ मार्च रोजी पोलिसांनी गोरेगावच्या संजय गांधी सोसायटीजवळ पोलिसांना सापळा रचून सागरला ताब्यात घेतलं. त्याच्याजवळून पोलिसांनी पोलिसांचा गणवेश, नागरिकांकडून नोकरी लावण्याच्या बहाण्याने घेतलेली कागदपत्रं आढळून आली. आतापर्यंत सागरने अनेकांना अशाप्रकारे गंडवल्याची कबुली दिली असून त्याचा ताबा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एमआयडीसी पोलिसांना दिला.



हेही वाचा-

'सावधान इंडिया' मालिका पाहून निवडला चोरीचा मार्ग

५ बांगलादेशी नागरिकांना अटक



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा