तोतया आरटीआय कार्यकर्ते गजाआड

 Mumbai
तोतया आरटीआय कार्यकर्ते गजाआड

नागपाड़ा - आरटीआय कार्यकर्ता असल्याची बतावणी करून खंडणी मागणाऱ्या दोघांना नागपाडा पोलिसांनी अटक केलीय. इर्शद अन्सारी उर्फ बोबडा आणि अकील शेख अशी या दोघांची नावं आहेत. त्यांची साथीदार महिला मात्र फरार झालीय. या तिघांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडून आरटीआयच्या नावावर लाखोंची खंडणी मागितली होती. व्यावसायिकाचं नागपाडा परिसरात इमारतीचं काम सुरू होतं. त्यानं काही परवानग्यांसाठी पालिकेकडे तसंच इतर सरकारी यंत्रणांकडे अर्ज केले होते. याची माहिती दोघांना मिळाल्यानंतर खंडणी उकलण्याचा खटाटोप सुरु केला. कामात अडथळा आणू अशी धमकी देत तिघांनी व्यावसायिकाकडून खंडणी मागितली. पण व्यावसायिकानं तिघांविरोधात तक्रार केली. त्यानंतर तोतया आरटीआय कार्यकर्त्यांना अटक झाली.

Loading Comments