मुंबईतल्या प्रसिद्ध ट्रस्ट व्यवस्थापनाला केंद्रीय गृहविभागाकडून खंडणीसाठी फोन ?

ट्रस्ट व्यवस्थापनाने मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

मुंबईतल्या प्रसिद्ध ट्रस्ट व्यवस्थापनाला केंद्रीय गृहविभागाकडून खंडणीसाठी फोन ?
SHARES

गृहविभागातील अधिकारी असल्याचे सांगून एका व्यक्तीने मुंबईतील प्रसिद्ध ट्रस्ट व्यवस्थापनाला फोन करून गैरव्यवहार प्रकरणात कारवाई न करण्यासाठी १० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. या प्रकरणी ट्रस्ट व्यवस्थापनाने मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- कल्याण डोंबिवलीत नवीन ३२८ कोरोना रुग्णांची नोंद

ऑगस्ट क्रांती मार्ग येथे राहणारे तक्रारदार प्रेम मसिह(६८) हे युनायटेड चर्च ऑफ नॉर्थ इंडियन ट्रस्ट असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. २१ जुलैला त्यांना उदयभान सिंग नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन केला होता.  त्यावेळी त्याने स्वतःची ओळख ही गृहविभागातील सचिव अशी सांगितली होती. त्याने ट्रस्टच्या गैरव्यवहारा विरोधात गृह विभागाकडे असंख्य तक्रारी आल्या असून ट्रस्टची मूळ कागदपत्रे घेऊन, व्यवस्थापनातील ट्रस्टींना दिल्लीला येण्यास सांगितले. मात्र कोरोना संक्रमणामुळे येथे शक्य नसल्याचे ट्रस्टींकडून सांगितले. त्यावेळी सिंग याने तुमची ट्रस्ट अस्तित्त्वातच नसून या ट्रस्टच्या नावाखाली तुम्ही १० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ट्रस्टीवर केला. तसेच दिल्लीला न आल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचाः- नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २६७ रुग्ण

त्याशिवाय प्रकरणी सीबीआय तुमच्या विरोधात गून्हा दाखल करून तुम्हाला जेलमध्ये टाकणार असल्याचीही भीती दाखवली. प्रेम यांनी दिल्लीस येण्यास नकार दिला. ट्रस्टचे सर्व कागदपत्र खरे असून कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी दूरध्वनी करणा-या सिंग याने १० कोटी रुपयांची मागणी केली. पाच कोटी पंतप्रधान कार्यालय व पाच कोटी रुपये सीबीआयसाठी देण्यास सांगितले. त्यामुळे प्रेम यांना आरोपी कोणत्याही सरकारी कार्यालयात काम करत नसून खंडणी उकळण्यासाठी प्रकार करत असल्याचा संशय त्याला आला. त्यामुळे त्यांनी सिंगच्या दूरध्वनींना उत्तर देणे बंद केले. त्यानंतर २७ जुलैला मसिह यांन भेटण्यासाठी एक व्यक्ती आला. त्याला सुरक्षा रक्षकांनी सोसायटीच्या गेटवर अडवले. त्यावेळी त्याने आपण दिल्लीवरून आलो असून मसिह यांच्या पूर्ण कुटुंबाला धमकावले. ट्रस्टच्या इतर काही सदस्य व त्यांच्या कुटुंबियांनाही अशाच पद्धतीने धमकावण्यात आल्याचे मसिह यांना कळाले. अखेर यांनी याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा