लालबाग सिलेंडर ब्लास्ट प्रकरणी पिता पुत्रांवर गुन्हे दाखल


लालबाग सिलेंडर ब्लास्ट प्रकरणी पिता पुत्रांवर गुन्हे दाखल
SHARES

लालबाग येथील साराभाई मेन्शन इमारतीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश राणे आणि त्यांचा मुलगा यश राणे यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला असून, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.


साराभाई मेन्शनमधील मंगेश राणे यांच्या घरात रविवारी सकाळी सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले. राणे यांचा कॅटरिंगचा व्यवसाय होता. व्यवसायासाठी लागणारे साहित्य, तसेच व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर त्यांनी या खोलीत ठेवले होते. खोलीतून गॅसगळती होत असल्याचे येथील रहिवाशांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. रविवारी सकाळी काही करण्याआधीच सिलिंडरचा स्फोट झाला आणि दुर्घटना घडली. यामध्ये दोघांचे नाहक बळी गेले. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी मंगेश आणि यश यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. जखमी झाल्याने दोघेही रुग्णालयात उपचार घेत असल्याने, घरी सोडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचाः- ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, न्यायालयाने दिली २० वर्षाची कठोर शिक्षा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा