३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, न्यायालयाने दिली २० वर्षाची कठोर शिक्षा

, आरोपीने कमी वयाचा दाखलाही दिला होता. पण, न्यायालयाने त्याची विनंती फेटाळून लावली.

३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, न्यायालयाने दिली २० वर्षाची कठोर शिक्षा
SHARES

नागरिकांच्या विकृतीचा दिवसेंदिवस कहर होत चालला आहे.  मुंबईत एका ३ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना न्यायालयाने २० वर्षाची कठोर शिक्षा सुनावली आहे. दोन्ही आरोपी हे महाविद्यालयीन तरुण आहे. पोलिसांनी त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्ह्यांची नोंद केली होती.

दोन वर्षापूर्वी ज्या वेळी मुलीच वय फक्त ३ वर्ष होतं. त्यावेळी यातील एका नराधमाने शेजारी राहणाऱ्या ३ वर्षाच्या मुलीला घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन अत्याचार केले. त्याच्यासोबत त्याचा मित्रही यात सहभागी होता. तर तिसरा आरोपी जो होता त्यानेही मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण, तिसरा आरोपी हा नाबालिक होता. खटल्यादरम्यान, मुलगी, तिची आई आणि काका साक्षीदार बनले. ही चिमुकली त्यांना इमारतीतील कॉमन पॅसेजमध्ये अस्वस्थ परिस्थितीत आढळून आल्याचं त्यांनी न्यायालयात सांगितलं. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, आरोपीने कमी वयाचा दाखलाही दिला होता. पण, न्यायालयाने त्याची विनंती फेटाळून लावली.

“जर आम्ही कमी वयाचा विचार केला तर कुठल्याही आरोपीला दोषी ठरवता येणार नाही, शिक्षा सुनावता येणार नाही. ती चिमुकली आरोपीला दादा म्हणून संबोधित करायची. पण, आरोपीने तिचा विश्वासघात करत तिच्यावर अत्याचार केला”, असं न्यायालयाने स्पष्ट म्हटलं. या आरोपींना न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा-बनावट नोटांची छपाई पाकच्या टाकसाळीत, चेंबूरमधून माजी नगरसेविकेच्या नवऱ्याला अटक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा