टवाळखोर मुलाला भीती दाखवण्यासाठी वडिलांनी ताणली बंदुक


टवाळखोर मुलाला भीती दाखवण्यासाठी वडिलांनी ताणली बंदुक
SHARES

वाया गेलेल्या मुलाला वेळोवेळी समजावूनही ऐकत नसल्यामुळे राग अनावर झालेल्या बापाने थेट मुलावरच बंदुक रोखून धरली. ऐवढ्यावरच न थांबता मुलाला धाकात ठेवण्यासाठी भिंतीवर गोळी झाडून घाबरवण्याचा प्रयत्न केल्याची घटना साकीनाका परिसरात घडली. या प्रकरणी मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार साकीनाका पोलिसांनी बापावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.  

हेही वाचाः- सर्वांसाठी लोकल सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

साकीनाका परिसरात राहणारे आरोपी अब्दुल सादिक चौधरी(६८) यांचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे परवाना धारक युकेमधील व्हीबी कंपनीची बंदुक आहे. पण बंदुकीचा वापर मुलावरच करावा लागेल, असे चौधरी यांना स्वप्नातही नसेल वाटते. घडलेला प्रकार असा, की चौधरी यांना सुबोही नावाचा २२ वर्षांचा मुलगा आहे. तरुण वयात असलेल्या सुबोही याला उच्चभ्रू जीवन जण्याची भारी हौस. मग काय ब्रांडेड कपडे, वस्तू पार पैशांचा नुसती उधळपट्टी. चौधरी तेवढेच व्यवहारी, त्यांना मुलाचा हा वायफळ खर्च आवडत नव्हता. त्यातून अनेकवेळा समजावणे झाले. त्यातून वादही झाले. पण पोरगा काय ऐकत नाही, अखेर अब्दुल्ला यांचा पारा शनिवारी चढला. त्याने आपली युके मेड बंदुक पोरावर रोखली. जरा धाक बसावा म्हणून एक गोळीही भींतीवर झाडली.

हेही वाचाः- देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, राणेंसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेत कपात

पण हा प्रकार करता करता, त्यांनी हत्यार बंदी कायद्याचे उल्लंघन केले. हे त्यांचा लक्षातच आले नाही. ते साकीनाका येथील कुर्ला-अंधेरी रोडवरील सागर हेरिटेज येथे घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांची गाडी थेट पोहोचली घटनास्थळी.  मग चौधरी यांच्या मुलाच्या जबाबावरून पोलिसांनी  ३६, ५०६ (२), भा.द.वि कलमांतस हत्यार बंदी कायदा कलम ३ व २७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. व चौधरी यांना अटक केली. त्यामुळे मुलाला बंदुकीचा धाक दाखवणे चौधरी यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा