SHARE

मुंबई - एफडीएच्या सहाय्यक आयुक्ताला 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने बुधवारी रंगेहात पकडले. प्रदीप मुंदडा असे या अधिकाऱ्याचे नाव असून, त्याने औषध दुकानाच्या सुनावणीदरम्यान दुकानदाराकडे चाळीस हजारांच्या लाचेची मागणी केली होती. 

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी 2014 मध्ये वांद्रयातील औषध दुकानांची पाहणी केली होती. त्यावेळी तक्रारदार औषध दुकानदाराच्या दुकानात फार्मासिस्ट नसल्याचे तसेच औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी सुनावणीदरम्यान अधिकाऱ्याने संबंधित दुकानदाराकडे 40 हजारांची लाच मागितली. 14 सप्टेंबरला बीकेसीत लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. दरम्यान गेल्या दोन वर्षात तीन वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने एफडीएतील भ्रष्टाचार समोर आला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या