जोगेश्वरीच्या मदरकेअर नर्सिंग होममधून विना परवाना औषधे जप्त


जोगेश्वरीच्या मदरकेअर नर्सिंग होममधून विना परवाना औषधे जप्त
SHARES

जोगेश्वरीच्या गोकुळ सोसायटी केवनीपाडा येथे असणाऱ्या मदरकेअर नर्सिंग होममधून शनिवारी विना परवाना असलेला औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

या मदरकेअर नर्सिंग होममध्ये विना परवाना औषधांची साठवणूक आणि विक्री होत असल्याची तक्रार एफडीएच्या काही अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, या तक्रारीची पडताळणी करायची म्हणून स्वत: औषध निरीक्षक आरती कांबळी आणि त्यांचे सहकारी अ. स. गोडसे यांनी काही सहकाऱ्यांसोबत रुग्णालयाला भेट दिली.


चौकशीत उघड

या तपासणी दरम्यान एका सहकाऱ्यास आणि एका रुग्णाला औषधांच्या चिठ्ठीसह रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर औषध खरेदीसाठी पाठवलं. त्यानंतर तिथे असणाऱ्या परिचारिकेने त्या रुग्णाला औषधांच्या चिठ्ठीवरील औषध दिली.



डाॅक्टरांची औषध खरेदी

पहिल्या मजल्यावर जाऊन अधिक चौकशी केली असता रुग्णालयाच्या एका खोलीत मोठ्या प्रमाणावर अॅलोपेथिक औषधांचा साठा असल्याचं, शिवाय या जागेला औषध विक्रीचा परवाना नसल्याचं आणि रुग्णालयाबाहेरील रुग्णांना औषध विक्री करत असल्याचं उघड झालं. तसंच हे सर्व औषधं डॉक्टर या रुग्णालयातील डॉक्टर स्वत:च्या नावाने खरेदी करून या विनापरवाना जागेत साठवत असल्याचंही या भेटीदरम्यान उघड झालं.

तरी, अन्न आणि औषध प्रशासनाने या रुग्णालयात जाऊन केलेल्या कारवाईत ४ लाख ११ हजारांचा‌ औषधांचा वापर जप्त केला आहे.

तसंच या प्रकरणात पुढील चौकशी आणि तपास सुरू असून औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असं अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा-

कफ सिरपची जाहिरात 'तुम्हारी सुलू' ला महागात? एफडीए बजावणार नोटीस

ब्रँण्डनेम फक्त नावालाच? मॅक्डाॅनल्डमध्येही बनतात अस्वच्छ पदार्थ, एफडीएने केली कारवाई


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा