साडुला गोवण्यासाठी दिली रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी

  Dharavi
  साडुला गोवण्यासाठी दिली रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी
  मुंबई  -  

  धारावी - आपल्या साडुला धडा शिकवणे धारावीतील एका इसमाला चांगलेच महागात पडले आहे. परळ स्थानक उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी धारावी पोलिसांनी मोहम्मद आबिद नावाच्या इसमाला ताब्यात घेतले आहे. 

  धारावीतील रहिवासी असलेल्या आबिदला त्याचे सासू-सासरे नेहमी टोमणे मारत होते. ते आबिदची तुलना त्यांचा दुसरा जावई कदर शेख यांच्याशी करत होते. चामड्याच्या कारखान्यात काम करणारा कदर शेख हा आबिदपेक्षा कसा श्रेष्ठ हे सासू सासरे आबिदला नेहमी ऐकवत. 

  या सगळ्याला वैतागून आपल्या साडुला धडा शिकवण्याचा आबिदने चंग बांधला. त्याला कोणत्यातरी गुन्ह्यात गोवण्याचा आबिदने डाव रचला. त्यानुसार शनिवारी पोलिसांना फोन करून कदर शेख नावाचा इसम हा रविवारी परळ स्टेशन उडवून देणार असल्याची माहिती दिली. या बेनामी कॉलनंतर चांगलीच खळबळ उडाली. परळ स्थानकाचा बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यानच्या काळात पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली आणि तपासात आबिदचं बिंग फुटलं. आपल्या साडुला गोवण्याचा आबिदचा प्लॅन होता. पण तो त्याच्याच अंगलट आला आणि पोलिसांनी त्याला धमकीचा फोन केल्याप्रकरणी ताब्यात घेतले. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.