लठ्ठ पणावरून सोशल मीडियावर कमेंट, गुन्हा दाखल


लठ्ठ पणावरून सोशल मीडियावर कमेंट, गुन्हा दाखल
SHARES

फेसबुकवर महीलेवर अश्लिल कमेंट करणे आणि अश्लिल फोटो पाठवणे एका तरूणाला चांगलेच महागात पडले असून त्याच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या राजावेल करिकलन नावाच्या इसमाने फेसबुकवर लठ्ठ महिलांवर काही पोस्ट टाकल्या होत्या, ज्याचा विरोध केला असता पीडित महिलेला अशा प्रकारे छळण्यात आल्याचं स्पष्ट झालंय.


लठ्ठपणावरून झाली सुरुवात

पीडित महिला ही मूळची पश्चिम बंगालची असून, नोकरी निमित्ताने ती शिवाजीपार्क परिसरात राहते. शनिवारी राजावेल करिकलन नावाच्या इसमाने 'लठ्ठ महिला या कुरुप असतात', अशी पोस्ट टाकली. या पोस्टवर पीडित महिलेने आक्षेप घेतला असता राजावेल करिकलन चवताळला आणि त्याने या महिलेला उद्देशून अश्लिल कमेंट्स करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने लठ्ठ महिलेचा एक अश्लिल फोटो देखील या महिलेला पाठवला. यानंतर मात्र महिलेने या विकृताला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि या नराधमाविरूद्घ गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवर ३५४ (विनयभंग) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक गंगाधर सोनावणे यांनी दिली आहे. राजावेल करिकलन हा देखील पश्चिम बंगालचा असून सध्या तो परदेशात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



हेही वाचा

भाजपाच्या 'या' पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा