भाजपाच्या 'या' पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल


भाजपाच्या 'या' पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
SHARES

मुलुंड विभागातील भाजपाच्या वॉर्ड क्रमांक १०७ चे अध्यक्ष प्रशांत सिनारी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत महिलेने मंगळवारी मुलुंड पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे.


पीडित महिलेला तक्रार न करण्याची दिली धमकी

पीडीत महिला ही विवाहित असून २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.१५ च्या सुमारास तिच्या राहत्या घरी बाथरूममध्ये अंघोळ करत होती. तेव्हा बाथरूमच्या एक्झोर्स्ट फॅनच्या खिडकीतून कोणीतरी डोकावून पाहत आहे, असा भास तिला झाला. म्हणून तिने आपल्या पतीला बाहेरून जाऊन पाहाण्यास सांगितले. त्यांच्या पतीने देखील ताबडतोब खिडकीपाशी धाव घेतली. तेव्हा आपल्या शेजारीच राहणारे प्रशांत सिनारी खिडकीतून आत डोकावून पाहत होते. त्यांनी ओरडताच प्रशांत यांनी तिथून पळ काढला. त्यानंतरही प्रशांत यांनी पीडित महिलेच्या पतीला यासंदर्भात तक्रार न करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मात्र पीडीत महिलेने मुलुंड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.

यासंदर्भात प्रशांत सिनारी यांच्याविरोधात कलम ३५४ क अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी दिली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा