कपिल-इरफानवर गुन्हा दाखल

  Oshiwara
  कपिल-इरफानवर गुन्हा दाखल
  मुंबई  -  

  ओशिवरा- कॉमेडियन कपिल शर्मा आणि सिने अभिनेते इरफान खान यांच्याविरूद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. आपल्या ओशिवरा येथील डीएलएच एन्क्लेव्ह इमारतीतील फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पी दक्षिण महापालिका विभागाचे सह अभियंते अभय जगताप यांनी एमआरटीपी कायद्यान्वये हा गुन्हा दाखल केलाय. कपिल शर्माने पंतप्रधानांना बीएमसीतील भ्रष्टाचाराबद्दल ट्विट केल्यानंतर बीएमसीने या प्रकरणी चौकशी सुरु केली. याप्रकरणी भाजपचे नेते राम कदम यांनी कपिलच्या घरासमोर आंदोलन करुन लाच मागितलेल्या अधिकाऱ्याचं नाव जाहीर करण्याची मागणी केली होती.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.