अर्णबच्या अडचणीत वाढ, सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी नवा गुन्हा दाखल

पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करत त्याच्याशी हुज्जत घातली. पोलिसांना त्याने १ तास घराबाहेर ठेवले.

अर्णबच्या अडचणीत वाढ, सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी नवा गुन्हा दाखल
SHARES

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक याच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे Republic TV editor संपादक अर्णब गोस्वामी यां Arnab goswami ना अलिबाग पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. मात्र अटक करण्यासाठी ज्या वेळी पोलिस अर्णबच्या घरी गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करत त्याच्याशी हुज्जत घातली. पोलिसांना त्याने १ तास घराबाहेर ठेवले. त्यानुसार ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात नवा गुन्हा नोंदवण्यता आला आहे.

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबागजवळील कावीर इथं आपल्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या आई कुमुद नाईक यांचाही घरात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी गोस्वामी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून अटक केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी अलिबागला नेलं आहे.

हेही वाचाः- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवासापासून सुरू होणार सिनेमागृह, नाट्यगृह

गोस्वामी यांच्या अटकेनंतर सोशल मिडियावर त्याच्या बाजूने आणि त्याच्या विरोधात अशा दोन्हीबाजूने प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. ट्विटरवर देखील अर्णबला ट्रेंड केले जात होते. तर दुसरीकडे भाजपने राज्यात आंदोलन केलं होतं. ही अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा हल्ला असल्याची टीका भाजपने केली होती. तर कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही सर्वांना सारखाच न्याय असल्याचं काँग्रेस आणि शिवसेनेने म्हटलं होतं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा