कुर्ल्यातल्या आगीावर नियंत्रण

कुर्ला - कपाडियानगर परिसरातल्या भंगारांच्या दुकानात आणि गोदामात गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सकाळी साडे चार वाजता अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या 10 गाडयांनी 4 तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. ही आग लाकडी सामानाचे गोदाम तसेच भंगाराच्या सामानाच्या दुकानांना लागली होती. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नाही.

Loading Comments