प्रेमनगर झोपडपट्टीत भीषण आग

धारावी - रविवारी पहाटे 4.30 च्या सुमारास शीव रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या प्रेमनगर झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना घडली. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु झोपडपट्टीच्या आतल्या भागात आग लागल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवताना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. प्लास्टिकचा कचरा वस्तू जास्त प्रमाणात असल्यामुळे आगीने तीव्ररुप धारण केले होते. दरम्यान सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. परंतु आग जास्त पसरल्यामुळे 50-60 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्नीशमन दलाच्या जवानांनी सकाळी 8 च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जातेय.

 

Loading Comments