कुर्ल्याच्या कपाडीयानगरमध्ये लागलेली आग आटोक्यात

कुर्ला - कपाडीयानगरच्या कुरैय्या कंपाउंड मधील कपड्याच्या आणि भंगार दुकानाच्या गोदामांना आग लागली. सकाळी साडेसहा दरम्यान ही आग आग लागली. या आगीची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी पोलीस आणि अग्निशामक दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी मिळून ही आग आटोक्यात आणली. सुदैवानं यात जीवित हानी झालेली नाही. मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. दोन तासांच्या अथक प्रयत्ना नंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन दलानं व्यक्त केला आहे. तर, स्थानिक लोकांनी मात्र हा आरोप खोडून काढत या विभागात नशेखोर जास्त प्रमाणात वाढले आहेत. त्यांनीच ही आग लावली असणार आरोप केला आहे.

Loading Comments