दादरमध्ये बॅगेच्या शोरूमला आग

दादर पश्चिमेकडील केळकर रोडवर असलेल्या एका बॅगेच्या शोरूमला शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने दुपारी 12.15 वाजताच्या सुमारास ही आग विझवण्यात आली. यामध्ये कोणीही जखमी किंवा कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

Loading Comments