कुर्ल्यात इंद्रानगर बिल्डिंगजवळील कचऱ्याला आग

कुर्ला -  कुर्ल्यातील इंद्रानगर बिल्डिंगजवळील कचऱ्याला आग लागली. शनिवारी रात्री 12.30 वाजता ही आग लागली. बिल्डिंगच्या जवळच चामड्याचा कारखाना आहे. त्यामुळे कचऱ्यात चामड्याच्या वस्तू मोठ्या प्रमाणात फेकल्या जातात. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. आगीच कारण अजूनही अस्पष्ट आहे.

Loading Comments