अंधेरीच्या सामराज हॉटेलला लागली आग, 7 जखमी

 Andheri
अंधेरीच्या सामराज हॉटेलला लागली आग, 7 जखमी

अंधेरी - सामराज हॉटेलला शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास आग लागली होती. यामध्ये 7 जण किरकोळ जखमी झाले आहेत. अंधेरी (पू.) इथल्या चकाला ग्रेशिअस रोडवर असलेल्या सामराज हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून आगीने पेट घेण्यास सुरूवात केली. दरम्यान रात्री 11.30 च्या सुमारास मरोळ अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि 7 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.

Loading Comments