आरेमध्ये इंडिका गाडीला आग

 Goregaon
आरेमध्ये इंडिका गाडीला आग
आरेमध्ये इंडिका गाडीला आग
See all

गोरेगाव - आरे कॉलनी युनिट नं १६ आरे रुग्णालयाच्या समोर शनिवारी ११ वाजता अचानक एका इंडिका गाडीच्या इंजिनला आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली. वाहनाचे मालक विरेंद्र भोसले गाडी घेऊन कांदिवलीपासून चांदिवली या ठिकाणी जात होते. गाडी नंबर MH03 AM0746 ही इंडिका गाडीच्या अचानक इंजिनने पेट घेतला. गाडीत विरेंद्र एकटेच होते. त्यामुळे ते पटकन बाहेर आले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. या दरम्यान अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली.

Loading Comments