मोठी दुर्घटना टळली

 Ghatkopar
मोठी दुर्घटना टळली
मोठी दुर्घटना टळली
मोठी दुर्घटना टळली
See all

घाटकोपर - पारशीवाडी परिसरातल्या एका चाळीतल्या समाजकल्याण केंद्रात फरसाण मार्टमध्ये आग लागली होती. सिलिंडर लिकेज होऊन आग लागल्याचं स्पष्ट झालं. सुदैवानं पेटला, तरी या सिलिंडरचा स्फोट झाला नाही. रात्री १०च्या दरम्यान या ठिकाणी काजूकतली बनवण्याचं काम सुरू असताना सिलिंडरला आग लागल्याचं एका कामगाराच्या लक्षात आलं. त्यानं प्रसंगावधान दाखवत पेटलेला सिलिंडर समाजकल्याण केंद्रातून बाहेर काढला आणि या कारखान्यातील कामगारांनी तिथून पळ काढला. शेजारच्या चाळीतल्या रहिवाशांनी माती आणि पाण्यानं आग विझवली. यात चंद्रकांत कांबळे हे ७२ वर्षीय रहिवासी जखमी झालेत. पोलिसांनी याप्रकरणी देवेंद्र ठाकूरला ताब्यात घेतलंय.

Loading Comments