या आगीला जबाबदार कोण?


SHARES

मुंबई - सिडनेहॅम... मुंबईतील प्रसिद्ध अशा महाविद्यालयांपैकी एक... आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सिडनेहॅमची लायब्ररी. 1970 सालापासूनची जुनी पुस्तकं सिडनेहॅमच्या लायब्ररीत वाचायची संधी इथे शिकण्याऱ्या विद्यार्थ्यांना मिळते. या लायब्ररीत पीएचडी, एमबीए, डॉक्टरेट या अभ्यासक्रमासाठी लागणारी महत्त्वाची पुस्तकेही विद्यार्थ्यांना वाचनासाठी मिळतात. मात्र आता विद्यार्थ्यांना या सगळ्यांपासून मुकावं लागणार आहे. त्याला कारण आहे या लायब्ररीला रविवारी सकाळी लागलेली मोठी आग. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं बोललं जातंय. याचाच अर्थ इथे वापरण्यात आलेली वायर निकृष्ठ दर्जाची  होती असे म्हणायला हरकत नाही. मात्र या सगळ्यामुळे नुकसान झालंय ते विद्यार्थ्यांचे. त्यामुळे यातील दोषींवर कारवाई होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा